वीर योद्धा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवरील विविध पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
या निवडीत श्री. अमोल भाऊ राखपसरे यांची पुणे जिल्हा युवक अध्यक्षपदी, तर सलीम भाई शेख यांची सातारा जिल्हा युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
तसेच श्री. सोनाजी भाऊ बरकडे यांची पुरंदर तालुका युवक अध्यक्षपदी, श्री. नितीन भाऊ साळुंखे यांची पुरंदर तालुकाध्यक्षपदी आणि पै. नागेश भाऊ बरकडे यांची पुरंदर तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
याचबरोबर श्री. स्वप्निल भाऊ जावळे यांची खंडाळा तालुका अध्यक्षपदी, तर श्री. अमोल भाऊ बनसोडे यांची बारामती तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
तसेच पै. अक्षय भाऊ जाधव यांची बारामती तालुका युवक अध्यक्षपदी आणि पै. किशोर भाऊ खंडागळे यांची वाई तालुका संघटकपदी निवड जाहीर करण्यात आली आहे.
या सर्व नियुक्त्या वीर योद्धा प्रतिष्ठान, पाडेगाव, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आल्या असून नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.